Cognitive Behavior Therapy (CBT)
Cognitive Therapy (CT), or Cognitive Behavior Therapy (CBT), developed by Dr. Aaron T. Beck, is a form of psychotherapy in which the therapist and the client work together as a team to identify and solve problems.
Therapists use the Cognitive Model to help clients overcome their difficulties by changing their thinking, behavior, and emotional responses.
Cognitive therapy has been found to be effective in more than 1000 outcome studies for a myriad of psychiatric disorders, including depression, anxiety disorders, eating disorders, and substance abuse, among others, and it is currently being tested for personality disorders.
It has also been demonstrated to be effective as an adjunctive treatment to medication for serious mental disorders such as bipolar disorder and schizophrenia. Cognitive therapy has been extended to and studied for adolescents and children, couples, and families. Its efficacy has also been established in the treatment of certain medical disorders, such as irritable bowel syndrome, chronic fatigue syndrome, hypertension, fibromyalgia, post-myocardial infarction depression, non-cardiac chest pain, cancer, diabetes, migraine, and other chronic pain disorders.
CBT (कॉग्नीटिव्ह बिहेविअर थेरपी)
““CBT(कॉग्नीटिव्ह बिहेविअर थेरपी)” ही मानसोपचारांच्या प्रचलित पद्धतींपैकी सर्वात जास्त शास्त्रीय संशोधन झालेली पद्धत आहे.
‘मानसोपचार’ म्हणजे फक्त कौन्सेलिंग नव्हे. मानसोपचाराच्या या पद्धतीमध्ये थेरपीस्ट (उपचार देणारा) आणि क्लायंट (उपचार घेणारा) मिळून क्लायंटच्या समस्येची सुप्त कारणे शोधून ती समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. थेरपीस्ट मानसोपचार कौशल्यांचा वापर करून क्लायंटच्या नकारात्मक विचार, वर्तन व भावनिक प्रतिसादांमध्ये बदल करायला मदत करतात. यामुळे क्लायंट त्याच्या समस्यांवर यशस्वीपणे मात करू शकतात.
जगभरातील हजाराहून अधिक शास्त्रीय प्रयोगांमध्ये हे सिद्ध झाले आहे की , CBT ही अनेक समस्यांचे (उदा. नैराश्य, चिंता विकार, व्यसनाधीनता) निवारण करण्यासाठी सर्वात उपुक्त मानसोपचार पद्धत आहे. तसेच भ्रम-भास विकार (स्किझोफ्रेनिया), नैराश्य-उन्माद विकार (बायपोलर मूड डिसऑर्डर) यांसारख्या गंभीर मानसिक आजारांमध्येसुद्धा औषधोपचारांसोबत CBT मानसोपचार पद्धती घेणे जास्त फायद्याचे ठरते. CBT ही मानसोपचार पद्धती मानसिक समस्यांबरोबरच दैनंदिन जीवनातील अनेक समस्या सोडविण्यासाठी उपुक्त ठरते (उदा. कामात लक्ष न लागणे, उत्साह न वाटणे, झोपेच्या तक्रारी, कौटुंबिक कलह, ताण-तणाव समायोजन (स्ट्रेस मॅनेजमेंट), व्यक्तिमत्व विकास, लहान मुलांच्या वर्तन समस्या). तसेच जुनाट वेदना, अनेक औषधोपचार करूनही बऱ्या न होणाऱ्या शारीरिक समस्या, उच्चरक्तदाब, मायग्रेन अशा शारीरिक तक्रारींसाठी देखील CBT ही मानसोपचार पद्धती उपयुक्त ठरते.
CBT मानसोपचारपद्धतीमध्ये प्रत्येकी सुमारे ४५ मिनिटांची ६ ते २० इतकी चर्चात्मक सेशन्स असतात व त्यावर आधारित काही वर्तणूक तंत्रे सुचविली जातात. प्रत्येक क्लायंटच्या समस्येवर सेशन्सची संख्या व वारंवारता अवलंबून असते.