blog-3

फिफ्टी – फिफ्टी

7 years ago / Recovery / 0 Comments

“मला आता जवळपास निम्म्यानं बरं वाटतंय डाॅक्टर!”
माझ्यासमोरची खुर्ची ओढून घेत बसता-बसताच ती म्हणाली.

“अच्छा..” असं मी म्हणतोय तोवरच तिच्या पाठोपाठ आलेली तिची आई एकदम कडाडली,  “काही ऐकू नका डॉक्टर तिचं! अजून तस्संच वागतेय ती.”
त्या मातेच्या झंजावाताकडे वळण्याखेरीज माझ्याकडे पर्यायच नव्हता.
“म्हणजे तिच्यात काहीच बदल नाही तर!”
” तसा बदल आहे.. पण, अजून तसं वागतेच.”
“किती असेल बदल अंदाजे? ”
” तसं.. नेमकं कसं सांगता येईल?”
” तरी अंदाज करा.. एका रुपयात चार आणे.. आठ आणे.. बारा आणे?”
“अं.. असेल आठ आणे”
आपल्या आईच्या या उत्तरानं पेशंटच्या चेहर्‍यावर उपहास, हताशपणा आणि  समजूतदारपणा यांचं एक  विलक्षण मिश्रण असलेलं हसू उमटलं.
‘प्याला अर्धा भरला म्हणायचं की अर्धा बाकी आहे म्हणून कण्हायचं’ याबाबत नक्की कुणाचं काऊन्सेलिंग गरजेचं आहे या विचारात मी क्षणभर गढून गेलो!

डाॅ. अनिमिष चव्हाण

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *