blog-3

केल्याने होते आहे रे…

7 years ago / Recovery Strength / 0 Comments

कामांचा मोठा ढिगारा पडलाय. दडपण आणणारा. कुठून सुरूवात करावी सुचत नाही. आणि काही सुचून काम सुरू करावे तोवर नवीनच काही तातडीचे काम उपटते!
अशावेळी मी घड्याळ सरळ दूरच ठेवतो. जो धागा सहज हाताशी येईल तिथून गुंता सोडवायला सुरूवात करतो. कित्येकदा तो धागा चुकीचा असतो; पण तो माझी हतबलता कमी करणारा धागा असतो! मला पर्यायी, अधिक योग्य धाग्यांपर्यंत नेण्याचे काम तो प्रारंभाचा धागा करतो.
ढिगारा कमी-जास्त होत रहातो; पण आता माझं मन त्या ढिगार् याखाली दबलेलं नसतं! माझं मन आता त्या ढिगार् याचीच सुंदर रचना करण्यात गुंग असतं. जणू एखादी मुक्त नक्षी काढावी तसं!
माझं आयुष्य, माझं जगणं, माझी नक्षी. बस, इथेच सर्व मोजमाप थांबायला हवं. मी थांबवायला हवं.

डाॅ. अनिमिष चव्हाण

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *