blog-3

विचारभान

9 years ago / General Strength / 0 Comments

काही दिवसांपूर्वी आमच्या मानसिक पुनर्वसन केंद्रात भारतातल्या काही आय. आय. टी. मध्ये शिकणारी मुले अभ्यासभेटीसाठी आली होती. अर्थातच त्यांचा मानसिक आरोग्यक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूपसा खुला आणि  सकारात्मक होता. उच्चशिक्षित व्यक्ती म्हणून आपण मानसिक आरोग्यक्षेत्रात कोणतं सामाजिक योगदान  देऊ शकू हेसमजून घेण्याची त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना मैत्रमधील आम्हा सर्व सहकार् यांना उत्साह वाटत होता.

त्यांच्याशी बोलताना मला एक प्रश्न त्या मुलांना विचारावासा वाटला आणि मी तो त्यांच्यासमोर चर्चेसाठी ठेवला. प्रश्न असा होता की, ‘सामाजिक हिताचं काम करतानाव्यावसायिक दृष्टीकोन असावा का? की व्यवसाय करताना सामाजिक दृष्टीकोन असणं हे अधिक चांगलं?’

प्रश्न ऐकून सुरूवातीला सर्वांनाच थोडं चमकल्यासारखं झालं खरं; पण नंतर सारे भरभरून बोलू लागले. अनेकांनी आपापले अनुभव सांगितले. आणि, नवी पिढी सामाजिकबाबतीत किती तयारीची आहे याचा प्रत्यय त्या चर्चेनं दिला.

व्यवसाय-नोकरी करावी, पैसे कमवावेत, आयुष्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा हे स्वप्न आजकाल कोणीही नि:शंकपणे पहातो. पण त्याचा अर्थ असे स्वप्न पाहणाराप्रत्येकजण  चंगळवादीच असतो असा निष्कर्ष काढता येत नाही.

आयुष्याचा आस्वाद घेऊ पाहणारा प्रत्येकजण आत्मकेंद्रित असतो असेही म्हणता येत नाही. उलट, आपल्या जगण्यावरचा स्वत:चा हक्क अबाधित ठेऊन त्यापोटी येणारी जबाबदारी पेलण्याची तयारी असणं हे जास्त निरोगी आहे. आणि ते समाजाचं जास्त हीत साधणारंही आहे. या सामाजिक जबाबदारीचा विस्तार जो तो आपापल्या क्षमता आणि निवडीनुसार कितीही करू शकतो. मात्र, त्याकरीता त्याला कोणतेही दडपण ना बाहेरून असते ना आतून.

असते ते निव्वळ विचारभान!

सामाजिक उत्तरदायित्वाचं अवडंबर माजवून काहीजण स्वत:लाच त्याखाली दडपून टाकतात. आणि हा दडपलेला ‘स्व’ अतृप्त आकांक्षांना भलतं सलतं रूप देऊनस्वत:पासूनच लपवायचा प्रयत्न करीत रहातो. स्वत:चीच वंचना आणि फसवणूक करण्याचा हा आजार म्हणजे सामाजिक काम करताना व्यावसायिक दृष्टीकोन बाळगणे असंम्हणता येईल.

इतकी वैचारिक स्पष्टता ज्या समाजातली नवी पिढी बाळगते आहे त्या समाजाचं मानसिक आरोग्य उंचावलं जाईल अशी आशा आपण नक्की बाळगू शकतो, नाही का?

डाॅ. अनिमिष चव्हाण.

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *